गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

अकबर-बिरबल कथा : माझ्या आज्ञेत राहावे लागेल

एकदा बिरबल आणि बादशहात कसल्या तरी मुद्यावरून वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला. असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक करीमखान नावाचा सरदार त्याला म्हणाला, ''बिरबलजी, खाविंद आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रिपद काढून घेतील आणि तुम्हाला कुत्तेवान म्हणजे कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमतील.'' 

यावर एका क्षणात बिरबल म्हणाला, ''करीमखान, खाविंदांनी जरी मला कुत्र्यांवरचा अधिकारी नेमले, तरी त्यात मला आनंदच वाटेल, कारण तुम्हाला मग माझ्याच आज्ञेत राहावं लागेल.''

बिरबलाने आपल्याला कुत्र्याच्या रांगेत बसविल्याचे पाहून करीमखान दात-ओठ खात तेथून निघून गेला.