शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

अकबर-बिरबल कथा - शाबास बिरबल!

एकदा राजवाड्यावरून दरबारात येतानाच बादशहाने मनाशी पक्के ठरवले की, काहीही करून आज बिरबलाला दरबारात असा प्रश्न ‍विचारायचा की, बिरबलाची दातखिळीच बसावी. याप्रमाणे दरबारात येऊन महत्वाची काही कामे झाल्यानंतर बादशहा बिरबलाला म्हणाला,

''बिरबल, पाण्याची मदत न घेता रेती आणि साखर यांच्या मिश्रणातून साखर कशी वेगळी काढता येईल?''

यावर बिरबल म्हणाला, ''असे, मिश्रण जमिनीवर पसरून ठेवायचे. काही वेळाने तेथे मुंग्या येतील आणि फक्त साखर घेऊन जातील.''

तेव्हा बादशाहा म्हणाला, ''वा! शाबास बिरबल, तू खरोखरच कमलीचा आहे.''