शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

अकबर-बिरबल कथा : सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच

WD
बादशहा आणि बिरबल एकदा युमनेच्या वाळवंटात फिरायला गेले होते. तेव्हा यमुनेच्या प्रवाहाचा धीरगंभीर आवाज ऐकून बादशहाने बिरबलला विचारले, ''अरे बिरबल, ही यमुना अशी का बरे रडत असेल ? ''

यावर बिरबल म्हणाला, '' महाराज, माहेर सोडून सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच. आपला पती सागर याच्याकडे चाललेली यमुना रडली, तर त्यात कसले नवल? ''