शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

म्हातारपणाची अवस्था!

मुलांनो तुम्हाला मानव जीवनाची अवकळा सांगण्यास मला रस वाटतो. तो हा स्वअनुभवाने! तर ऐका! व अवश्य वाचून दुसऱ्यांनाही सांगा तो प्रेरणादायक आहे.

वयाची 70 वी गाठली. पण जन्माला आल्यापासून, वयोवृद्धापर्यंत ज्या सुखापेक्षा दु:ख अधिक वाट्यास येत असते. ते म्हणजे सर्व साधारण गरीब ते मध्यम वर्गीयांच्या वाट्यास. जन्माला आला की, तो मुलगा अथवा मुलगी असो! सुखाचे, हसण्याचे, खेळण्याचे दिवस असतात. त्यावेळेस त्याला कळत नसते. खाणं, पिणे, हसणे, बागडणे, सर्वांच्या खांद्याकडेवर वसण्याचे हे झाले बालपणाचे! अल्लडपणा!!

तरुण वयात कळत न कळत शाळा, कॉलेज, अधिकाधिक! ऐन तारुण्यात परिस्थितीनुसार काम करण्याची तयारी! एवढी मात करून शिक्षण घेण्याची अवस्था, रात्र-प्रशाला, कॉलेज जाण्याची तयारी व जिद्द!..... वयोमानाने पाल्याची सरस्वती जबाबदारी, मग बहीण-भाऊ यांची लग्ने, मग ती परिस्थितीनुसार कर्ज अथवा गहाण, चीजवस्तू, जमीन जुमला असेल तर! ह्या तरुण अवस्थेत अतोनात कष्ट, जिद्द, कामाची रात्रंदिवस पराकाष्ट वगैरे, वगैरे!! असेल तर खाणार नसेल तर उपाशी राहणार ह्या अवस्थेत. 'जीवनातली गडी अशीच राहू दे' असे कुटुंब वत्सल नाते गोते! रक्त मांसातील नातेवाईकांकडून मिळत असते. यावरचं आपण सुख समाधानी राहू शकतो.! उपाशी पोटी!! आले म्हातारपण!!

म्हातारपणा येणारे दुरवस्था अधिक! अधिक धक्कादायक व विचारसरणीची असते. त्याला म्हातारापण यावं लागतं. ते बहुतांच्या नशिबीही नसतं. ते माझ्या नशिबी आलं. सर्वच म्हातारे पेन्शनर्स असतात असे नव्हे. तर काहींना आपल्या जन्मदात्या मुलांवर अवलंबून राहावे लागतात. त्यात मरेपर्यंत साथ देणारी पत्नी जर मला सोडून देवाघरी गेली तर! अधिक, अधिक दुरवस्था! बहुतेक 90 टक्के चिरंजीव आपल्या आई-वडिलांस पैसे गेले तरी वृद्धाश्रमात दाखल करतात. नाती नातवात हिंडणे फिरणे, बागडणे, खेळण्यापासून वंचित राहावे लागते. अशी सद्याच्या 21 व्या शतकातील सत्य अवस्था (घटना) आहेत.
 
वयाच्या मानाने विसरणे, लक्षात न राहणे, अवेळी खाणं-पिणे हे आलंच. त्यात साठी, हात काठी ही येतेच. मग व्याधी आल्याचं हात पाय दुखणे, अंधुक दिसणे, घराच्या बाहेर न पडणे, औषधपाणी घेणं, जगता येत नाही म्हणून जगणे. ह्या स र्व व्याधींमुळे मला अंधुक दिसण्यामुळे डॉक्टरने दिलेली थेंबाची बाटली व पाण्यात टाकण्यासाठी जंतुनाशक बाटली शेजारी शेजारी होती. रोज रात्री झोपताना घालितं असता अशी एकदा रात्री 12 वाजता मी ती डोळ्यात घालण्याची थेंबाची बाटलीऐवजी पाण्यात टाकण्याची थेंबाचे औषध घालते. (जंतुनाशक) त्यावेळी आठवणं काय सांगायचं माझ्या आईचे दूध आठवले. डोळ्याची अतिशय आग होवून अक्षरश: लघुशंकाच आली. काय करावे! काही ही सुचत नव्हते. ती तळमळती रात्र कशी बशी जागवत घालविली व दुसऱ्या दिवशी सकाळीच 6 वाजता जवळील डोळ्यांच्या दवाखान्यात डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर माझ्यावर रागावून डोळे पाण्याने धुण्यास सांगितले. त्यामुळे मी केले. डोळे तपासून औषधाचे थेंब टाकले. अर्धा तास बसून परत औषध थेंब टाकले. अर्धा तास बसून घरी जाण्यास सांगितले. यावर डॉक्टरांनी स्वत: सांगितले डाव्या डोळ्याला जखम झाली ती भरून येण्यासाठी महिनाभर औषध उपचार करावे लागतील नाहीतर ऍडमिट होवून ऑपरेशन करावे लागले. ह्या संभाषणाने मी अर्धा मेला झालो. नसती ती झंजट अंगी बाळगून चिंतातुर झालो. आता मी एक डोळ्याने आंधळा होणार याची खंत जाणवली. अधिकाधिक भयभीत झालो.

ऑपरेशन टाळण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन, डोळे तपासून नवनवीन औषध, मलम, गोळ्या देऊन रोज तपासण्याला बोलावून आठ दिवसात माझे डोळे पूर्ववत झाले व समाधानकारक वाटले. केवढा अनर्थ टळला! मात्र केवढा मोठा अनर्थ टळला! याचे मला अजून अधिक वाईट वाटते.

म्हणून आपणास बाळगोपाळास सांगावयासे वाटते की ह्या लेखनाद्वारे आलेला स्वअनुभव मी लिहिला तो तुम्ही वाचला यावरून आपण आपल्या घरातील आजी-आजोबांना औषध आपण देऊन त्यांना सहकार्य करावे अन्यथा काही अनर्थ घडू नये ह्यापासून परावृत्त करावी हीच खरी सेवाभावी सेवा!! व सहकार्याची भावना. लक्षात ठेवा व अंगी बाळगा. हेच सांगण्यास व सत्य प्रपंच. क्षमस्व.

- आपला एक ज्येष्ठ नागरिक.