गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2015 (15:54 IST)

स्वार्थी कोळी

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशां जाळ्यात यावा म्हणून, एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. त्या गावात राहणार्‍यांना लोकांनी हे पाहिले तर त्यापैकी एक पुढे येऊन त्या कोळ्यास म्हणाला, ‘अरे, तू या काठीने इतक्या जोरात पाणी बडवीत बसला आहेस, याचे कारण तरी काय ? आणि मुख्य म्हणजे तुझ्या ह्या कृत्यामुळे आमचे पिण्याचे पाणी गढूळ होत आहे, हे तुला कळतं नाही काय ?

’यावर कोळीने उत्तर दिले की, ‘हे बघा, मला फक्त इतकेच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मासे मिळणार नाही, आणि याशिवाय दुसरा मार्ग नाही. हे पाणी गढूळ केलेच पाहिजे, नाही तर मी उपाशी राहीन.

 
तात्पर्य- स्वार्थी लोकं स्वतःच्या अल्प फायद्यासाठी दुसर्‍यांचे कितीही नुकसान झाले, तरी ते करण्यास चुकत नाहीत.