गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

सावध व्हा! असे जेवण बनवाल तर ते होईल विषारी !

जेवण बनविण्याच्या अश्या काही पद्धती आहेत ज्यामुळे जेवण स्वादिष्ट तर बनत असेल पण ती पद्धत पदार्थांना विषारी करते. पाहू काय आहे या पद्धती:
 
* अनेक लोकं जेवण गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हचा उपयोग करतात. परंतु आपल्याला माहीत आहे का की यात तयार केलेले पदार्थ पूर्णपणे विकृत असतात. हे खाल्ल्याने रक्त पेशींमध्ये, एलडीएल आणि एचडीएल यात परिवर्तन येतं.
* जळके किंवा करपलेले पदार्थ खाऊ नये. अनेक लोकं मीट असेच तयार करतात. ही पद्धत विषारी आहे कारण याने आहारातील प्रोटीन विकृत होतं परिणामस्वरूप पचायला त्रास होतो. याने रोगप्रतिकार प्रणालीवर देखील प्रभाव पडतो. या प्रक्रियेत मीटमध्ये आढळणारे फॅट्सचे कण ऑक्सीकृत होऊन उत्तेजक बनतात.

* यात काहीच शंका नाही की बार्बेक्यू पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांचा स्वाद तोंडाला पाणी सुटेल असा असतो पण अश्या पदार्थ सूज आणि कर्करोगाला कारणीभूत असतात. याऐवजी मंद आचेवर शेकलेले पदार्थ खायला हवे जे कमी मात्रेत विषारी पदार्थ उत्पन्न करतात.

* तेलात तळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतू या प्रक्रियेत आपला पदार्थ ऑक्सीडाइज्ड फॅट्स, ग्ल्यकॅटेड शुगर आणि विकृत प्रोटीनचा स्रोत बनून जातो. ज्या तापमानावर पदार्थ तळले जातात त्यात विषारी तत्त्वांची वृद्धी होते ज्याने कर्करोगाचा धोका वाढतो.
 
 
* ब्राइलिंग ही पद्धत ही आरोग्यासाठी योग्य नाही. यात मीट शिजवण्यासाठी चारी बाजूने आग पेटवली जाते. याने मीटच्या बाहेर ग्लुकोमेट निर्मित होतं आणि फॅट्स ऑक्सीकृत होतात.