शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

आंब्याचा रस किंवा श्रीखंड आंबट असल्यास हे करा

* आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते.
* आमरस - आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.
 
* श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत, साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे.
 
* गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात.
 

* मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत.
 
* बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात. खमंग होतात.
* गोड बुंदी, बर्फीचे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे.
 
* बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.