Widgets Magazine
Widgets Magazine

महत्त्वाच्या किचन टिप्स

* मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा.
* तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो.
* पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.
* सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल.
* रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्शात घालावा.
* कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.
* भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं.
* हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
* पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्‍या खुसखुशीत बनतील.
* मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.
* डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा.
* दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.
* हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.
* भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणीक मळताना ही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवर ही शिजवू शकता.
* भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

खमंग काकडी

कृती- काकडीचे सालं काढून दोन्ही टोकं कापून मीठ लावून चोळून घ्या, म्हणजे काकडीतील कडवटपणा ...

news

बीना साखरेचे तयार करा चॉकलेट बनाना आइसक्रीम

म्हणायचा तात्पर्य असा की यात फार कमी केलोरी असते. या आइसक्रीमला तयार करण्यासाठी तुम्हाला ...

news

साबुदाण्याच्या पुर्‍या

सर्वप्रथम बटाटे आणि साबुदाण्याला मॅश करून शिंगाड्याच्या पिठात चांगल्या प्रकारे मिक्स करून ...

news

काय आपणही चहा बनवल्यानंतर फेकून देता चहा पत्ती?

दिवसातून किमान दोनदा तरी प्रत्येकाच्या घरात चहा बनतो. अनेक लोकांकडे याहून अधिक वेळा. ...