मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

बटाटे उकडलेल्या पाण्याने सिंक स्वच्छ करा

* चहाचा चोथा फेकू नका तो स्वच्छत धुवून पाण्यात उकळून घेवून त्या पाण्याना केस धुवा. केस काळे व चमकदार होतात.
 
* सेलो टेप अत्यंत पातळ असतो त्यामुळे त्याचे टोक लवकर सापडत नाही. सेलो टेप जरावेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचे टोक सुटते.
 
* बटाटे उकडलेल्या पाण्याने तेलकट भांडी स्वच्छ करा. अथवा सिंक स्वच्छ करा. याशिवाय चांदीचे दागिने या पाण्यात ब्रशने घासून स्वच्छ करा.

* जेवण झाल्यानंतरचे उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी ते झाकण लावून ठेवण्याऐवजी मोठ्या दुकानात मिळणार्‍या रॅपर प्लास्टिक पेपरचा वापर करावा. भांड्यात अन्न काढून घेऊन त्यावर प्लास्टिक पेपर घालावा. भांड्याच्या बाहेरून तो भांड्याला चिकटून बसतो. त्यामुळे अन्न जसेच्या तसे राहते.  
 
* वापरलेल्या लिंबाच्या साली सुकुवून वाटून घ्याव्यात व त्या पावडरमध्ये थोडे दुध व हळद मिसळून त्वचेवर लावावी. त्वचा उजळते. 
 
* बदामाची टरफले टाकून न देता जाळून त्याची राख करावी. त्यामध्ये लवंग सैधव मीठ घालून दात घासावेत दात चमकदार होतात.