गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

मायक्रोवेव्ह वापरता येतं का?

अलीकडे स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह हे आवश्यक साधन झाले आहे. पण आपण त्याच्या व्यवस्थित वापर करत आहोत का? हे जाणून घेणेही आवश्यक आहे. नाहीतर कित्येक घरामध्ये मायक्रोवेव्हचा वापर केवळ अन्न गरम करण्यासाठीचं केला जातो.


 
* मायक्रोवेव्ह वापरताना त्याचे दार व्यवस्थित बंद करा. नाहीतर आत ठेवलेल्या पदार्थाला पर्याप्त उष्णता मिळणार नाही आणि परिणामस्वरूप पदार्थ शिजायला वेळ लागेल.
 
मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ व्यवस्थित शिजत आहे की नाही ही शंका मनात असल्यावर काही जण वारंवार दार उघडत असतात. असे करणे चूक आहे. याने आतील तापमान घसरतो आणि पदार्थ नीट शिजत नाही.

* मायक्रोवेव्हमध्ये काही पदार्थ शिजवण्याआधी ते प्री हिट करा. याने आपल्या रेसिपी बुकमध्ये दिलेल्या वेळेत आपले पदार्थ शिजून तयार होईल.
 
मायक्रो खूप वेळ चालवण्यात आलं असेल तर पदार्थ बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळ त्याचे दार उघडेच राहू द्या.
 
मायक्रोचा वापर झाल्यावर ते स्विच ऑफ करून आतली प्लेट स्वच्छ पुसून घ्या. पुसण्यासाठी सॉफ्ट कापड किंवा स्पंजचा वापर करा.