शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By वेबदुनिया|

आईची शिकवण

तू पाखरू माझ्या घरकुलाचे
घे आता भरारी या नभांगणी
दोन दिवसाचे बालपण
गेले बाळा सरूनी आता
काऊ चिऊचा घास संपला
ओवी संपली रात्रीची
मायेच्या कुशीची झोप संपली
घे आता भरारी या नभांगणी

मायेने केले संगोपन
दिले आदर्शाचे वळण
देऊन हाती पुस्तक नाती चे
घातले धडे संस्काराचे
संपली शिक्षा निज गृहीची माझ्या
घे आता भरारी या नभांगणी

आशेच्या नभांगणी पसर
पंख आपुल्या प्रयत्नांचे
समोर असु दे जीवन लक्ष्य
कर प्रयत्न साधण्याचा
मनी असु दे बळ विश्वासाचे
हे नभांगण होईल निश्चित तुझे
घे आता भरारी या नभांगणी

कापर्‍या माझ्या स्वरानी
गुण-गुणीन ओवी मी जुनी
प्रयत्न करीन तुला पाहण्याचा
उच्च नील वर्ण ह्या नभांगणी
आत्म विश्वास वदतो माझा
होशील जरूर तू स्वामीनी
ह्या दैदिप्त सूर्य प्रकाशाची
बस घे भरारी या नभांगणी.....