शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By वेबदुनिया|

माऊली कृपेची

सुंदर वडील । सुंदर ती आई 
जशी रखुमाई । विठ्ठलासी ।।1।।
जाताना शाळेत । न्याहरीचा डबा
देते माऊली बा । न चुकता ।।2।।
दिलेला अभ्यास । करवूनी घेई,
तोंडपाठ होई । दिलेला तो ।।3।।
घरी येता येता । थकलो शिणलो,
आळशी जाहलो । शीण काढी ।।4।।
वाढवीले मज । जाहलो सज्ञान
ठेवता जतन । मान तिचा ।।5 ।।
माऊली कृपेची । सावली तियेची,
बरोबरी तिची । न ये कोणा ।।6।।