शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

प्रेम म्हणजे.?

मला माझ्या मित्राने विचारले की, प्रेम म्हणजे नेमके काय?
 
मी त्याला सांगितले की,
 
कितीही जवळ जाणार असशील तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर, असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. 
 
दिवाळीला स्वत:साठी साधे कपडेही न घेता मुला-मुलींसाठी त्यांच्या पसंतीचे महागातल्या जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.
 
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाला तरी आई-बाबांना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. 
 
कितीही वाद झाले तरी 'जेवलास का?' अशी विचारणारी बहीण म्हणजे प्रेम. 
 
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजेला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम. 
 
आणि या सर्वांची काळजी घेऊन स्वत:ची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम.