शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमगीत
Written By वेबदुनिया|

नसतेस घरी तू जेव्हा

- कवी संदीप खरे

ND
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका... तुटका होतो
जगण्याचे विरती धागे,
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवत
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होत

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती माग
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जात

ना अजून झालो मोठ
ना स्वतंत्र अजुनी झाल
तुज वाचून उमजत जाते
तुज वाचून जन्मच अडत

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदार
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका...