testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जपावे भावबंध

love
वेबदुनिया|
पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होतो. आपली फसवणूक करतोय असं हळूहळू वाटायला लागतं. अनेकदा थोडय़ाशा बेपर्वाइनेही अविश्वास निर्माण होतो.पती-पत्नीचं नातं फार नाजूक असतं. छोटय़ा कारणांमुळेही या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. या नात्यामध्ये कायम गोडवा रहावा असं कोणाला वाटणार नाही? असं असलं तरी कधी तरी हे संबंध बिघडण्याच्या स्थितीत येतात. त्याची कारणं छोटी असतात. पण, कालांतराने या नात्यात बाधा येते. मनोविकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाच महत्त्वाच्या कारणांमुळे या नात्यात दुरावा निर्माण होतो. परस्परसंवादाची कमतरता हे त्यातील प्रमुख कारण आहे. दिवसभरात आपण काय केलं याबाबत पती-पत्नीमध्ये बोलणं होत असतं. पण, हे आपल्यातील चांगलं कम्युनिकेशन आहे असं मानणं योग्य ठरत नाही. पती-पत्नी शांतपणे बसून आपण पुढे काय करायचं ठरवलं आहे, आपली भविष्यातील स्वप्नं काय आहेत याची चर्चा करत आपले विचार शेअर करतात. त्यावेळी त्यांच्यामध्ये खर्‍या अर्थाने चांगलं कम्युनिकेशन घडतं. रोज थोडा वेळ काढून आपलं रुटीन, काम आणि मुलं असे मुद्दे वगळून एकमेकांशी संवाद साधला तर हे नाजूक संबंध मजबूत व्हायला मदत होते. चोवीस तासांपैकी परस्परांशी संवाद साधायला किमान तासभर तरी काढावा.
पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये गैरसमजांमुळे अविश्वास निर्माण होतो. जोडीदार आपली फसवणूक करतोय असं हळूहळू वाटायला लागतं. अनेकदा थोडय़ाशा बेपर्वाइनेही अविश्वास निर्माण होतो. घरी यायला उशीर होणार असेल तर दोघांनीही एकमेकांना खरं कारण सांगावं. खोटं बोलण्यापासून नेहमी दूर राहिल्यास जोडीदाराच्या मनातील संशय वाढत जातो. परस्परांच्या भावनांबद्दल नेहमी संवेदनशील रहायला हवं. लग्नापूर्वीच्या संबंधांबाबत वारंवार बोलू नये. जोडीदार आपल्या सर्व मागण्या पूर्ण करेल असं समजू नये. आपली एखादी मागणी पूर्ण झाली नसेल तर नाराज होण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घ्यावं.
कांचन रिद्धी


यावर अधिक वाचा :

ज्ञानयोगी बाबासाहेब

national news
दलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...

जाकार्ता बुडण्याच्या दिशेने

national news
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...

CWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण

national news
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...

काठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार

national news
वरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...

CWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...