मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2016 (11:42 IST)

आई-वडिलांपासून तरुणाई लपवतात या 5 गोष्टी

तरुण वयात मुले-मुली आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी लपवतात. ज्यावेळेत पालकांच्या सल्ल्याची गरज असते त्यावेळेत मुले पालकांकडून काही गोष्टी लपवतात. आई-वडिलांनीही मुलांच्या वागण्यात काही बदल जाणवले तर त्याबाबत विचारणा करण्याची गरज आहे. 
 
1. आकर्षण : तारुण्यात मुला-मुलींचं एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाढू लागतं. ते कोणाला तरी पसंद करत असतात पण ही गोष्ट ते आपल्या पालकांकडून लपवतात. 
 
2. पार्टी : तारुण्यात पार्टी हा तर आता अनेकांसाठी सामान्य विषय झालाय. पण अनेक तरुण पार्टीला जात असल्याची गोष्ट कधीच आपल्या पालकांना सांगत नाहीत. 
 
3. कॉलेज बंक : कॉलेज बंक हा तर अनेक तरुणांसाठी नवा नाही. अनेक कॉलेज स्टुडंट कॉलेज बंक करुण मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जातात. पण ही गोष्ट त्यांच्या पालकांना कधीच कळू देत नाहीत. 
 
4. मोबाइलचा गैरवापर : आज खूपच कमी तरुण-तरुणी अशा मिळतील ज्यांच्याकडे मोबाइल फोन नाही. फोनवर गप्पा मारणे आणि रात्री चादरीमध्येही अनेक जण मोबाइल चॅटिंग करत असतात.
 
5. मित्र-मैत्रिणी : अनेक पालकांना आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी माहितीच नसतात. तारुण्यात अनेकांना वाईट सवयी लागतात त्या वाईट संगतीमुळे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवणे आवश्यक आहे.