मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (16:35 IST)

नातेसंबंध टिकवणार्‍या चांगल्या सवयी

बहुतांश आवडीनिवडी सारख्या असणार्‍या व्यक्तीसोबत केवळ जुळवून घेणे म्हणजे नातेसंबंध नव्हेत. नात्यांची इमारत उभी करणारा तो एक घटक आहे. काही चांगल्या सवयी आणि वागणूक अंगी येणार्‍या दीर्घजीवनात नात्याचा घट्टपणा सामावलेला असतो. तुमच्या नात्यासाठी फायद्याच्या ठरणार्‍या या सवयींबद्दल.
 
तुमच्या अपेक्षा स्पष्ट करा
नातेसंबंधांमध्ये अडचणी येण्यासाठी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा हे मुख्य कारण असते. दोन व्यक्तींमधील नात्याची वाढ होण्यामध्ये एकेकांबद्दलच्या अपेक्षा महत्त्वाची भूमिका निभावत असतात. मतभेद युक्तीने मिटवून दोन्ही जोडीदारांना समाधान मिळण्यातच निरोगी नातेसंबंध सामावलेले आहेत.
 
जोडीदार परिपूर्ण नसतो
आपला जोडीदार हा परिपूर्ण व्यक्ती नाही, ही गोष्ट तुम्ही स्वीकारायला हवी. प्रत्येक गरज पूर्ण करण्याची अपेक्षा जोडीदाराकडून कराल, तर तुमचा अपेक्षाभंग होईल. प्रत्येकजण चुका करतो आणि ही नैसर्गिक सवय आहे. त्यामुळेच क्षमा करायला शिका आणि जोडीदारासमोर काहिसे नमते घ्या. नातेसंबंध निभावणे म्हणजे एखादे काम नाही, तर एकमेकांना परिपूर्ण करणे, तसेच एन्जॉयमेंट आहे, हे ध्यानात घ्या.
 
यु्क्तिवाद तर्काने करा
नातेसंबंधांमध्ये यक्तिवाद करणे ही सामान्य बाब आहे. मात्र, एकमेकांचा उपहास किंवा अपमान करणे ही वाईट सवय असून त्यामुळे तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तुम्हाला काय खटकते किंवा कशाचा त्रास होतो याबद्दल शांतपणे बोला. प्रत्येक मुद्याला तर्काचा आधार द्या. तर्कशुद्ध युक्तिवादाचा कोणालाही राग येत नाही आणि त्यामुळे तुम्ही एकाच पातळीवर येता. त्याचा दोघांनाही फायदा होतो. तुमचे नातेसंबंध निरोगी, तसेच दीर्घायू राहण्यासाठी या सवयींचा अंगीकार करा.