गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

पहिल्या नजरेतील प्रेम....

किशोरावस्थेतून आपण तारूण्यात पदार्पण करतो त्यावेळी जगातील सगळ्या गोष्ट बदललेल्या जाणवू लागतात. जग किती सुंदर आहे, याचा अनुभव येतो. तारूण्य जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देत असते. तारूण्यात तिला 'तो' आणि त्याला 'ती' आवडते अन् पहिल्यात नजरेतच हृदयात प्रेमाचा अंकुर फुलतो.
 
'प्रेम' काय आहे, हे तेव्हा त्या दोघांनीही कळत नाही. 'प्रेम' ही संकल्पनाच रहस्यमयी आहे. त्यावर मिर्झा गालिब साहेब लिहितात...' इस इश्क के कायदे भी अजब है गालिब, करो तो बेहाल है, न करो तो बेहाल!' 'प्रेम' या अडीच अक्षराच्या शब्दाने फार मोठा इतिहास घडवला आहे. लैला- मजनू, हिर-रांझा, रोमिओ- ज्युलिएट हे इतिहासातील प्रेमी युगल म्हणूनच अजरामर झाले आहेत. 'प्रेम' ही अशी भावना आहे की, तिचा परिणाम हळूहळू जाणवतो. काही जणांच्या मते, पहिल्या नजरेतच प्रेम व्यक्त होते. प्रेमाचा बाण क्षणात 'तिच्या' किंवा 'त्याच्या' हृदयाला छेदतो. 
 
'यह मोहब्बत का तीर है प्यारो, जिगर के पार हो जाता है...पता भी नही चलता, न जाने कब प्यार हो जाता है !' जगाने प्रेमाला कितीही विरोध केला तरी आम्ही त्याच्याविरूध्द नाही, असे तरूण-तरूणी म्हणतात. पहिल्याच नजरेत होणारे प्रेम दोन्ही बाजूला आग लावणारे असते. परंतु, ही आग दोन जीवांना एकत्र आणते. या आगीतच प्रेमी युगल प्रेमात पार बुडून जातात. दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांना अबोध मनाच्या कप्प्यात संपूर्ण आयुष्याची शिदोरी म्हणून बांधून ठेवतात. 'प्रेम' हे परमेश्वराचेच रूप आहे. परंतु, या प्रेमाचा अतिरेक होऊ नका. कारण प्रेम हे आयुष्य घडवतं आणि बिघडवतंही. 
 
पहिल्या नजरेत होणार्‍या प्रेमात महत्त्वाचे म्हणजे टायमिंग आहे. पहिल्या नजरेत होणारे प्रेम ओळखायला फार कठीण असते. केवळ 'तिने' किंवा 'त्याने' आपल्याकडे पाहिले, म्हणजे 'प्रेम' झाले असे नाही तर प्रेमाच्या नजरेला ओळखण्याची कला, दृष्टी आपल्याकडे असणे आवश्यक असते. ही दृष्टी तारूण्याच्या उंबरठ्यावर परमेश्वराकडून मिळालेली अपूर्व भेट आहे. पहिल्या नजरेत 'तिला' किंवा 'त्याला' पाहिल्यानंतर हृदयात तार झंकारली गेली पाहिजे. प्रेमाच्या तरंग लहरी संपूर्ण अंगावरून गेल्या पाहिजेत. अशी प्रेमाच्या भावनेची जाणीव पहिल्या नजरेत झाली पाहिजे.....