शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (17:23 IST)

आज तुम्ही पिऊन आलात ना ?

सोमवारी रात्र:
 
बायको : आज तुम्ही पिऊन आलात ना ?
नवरा : हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी लागते.
 
मंगळवारी रात्री:
 
बायको : आज परत पिऊन आलात ? 
नवरा : अरे आज एका मित्राची एंगेजमेंट पार्टी महणून.....
 
बुधवारी रात्री:
 
बायको : आज पण तुम्ही पिऊन आला ?
नवरा : अगं, आज एका मित्राचं ब्रेकअप झालं बिचार्‍याच मन नाही दुखवू वाटलं ! 
 
गुरूवारी रात्री :
बायको : आज ही , आता आज आणखी कोणाचा ब्रेकअप झाला ?
नवरा : ब्रेकअप नाही, ऑफिसात कामाचा लोड फार होता. डोकं फार भणभण करायला म्हणून. ....
 
शुक्रवारी रात्री:
 
बायको : आज काय झालं ?
नवरा : अगं मंगळवारी ज्या मित्राची एंगेजमेंट झाली ना त्याच॔ आज लग्न होतं म्हणून आनंद साजरा केला. कळलं ना .
 
शनिवारी रात्री:
 
बायको : हम्म.....आज ?
नवरा : आज जुने मित्र भेटले त्यांनी मला डिस्को मध्ये घेऊन गेले अन् फार जबरदस्ती केली. मी ही फार ना केली पण शेवटी घ्यावी लागली. 
 
रविवारी रात्री :
 
बायको ( रागात ) : आज काय झालं ?
नवरा ( तेवढ्याच रागात ) : च्यायला, माणूस कधी स्वतःच्या मनाने नाही का पिऊ शकत !