शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (15:14 IST)

सुखी संसाराचे रहस्य

सर्व विवाहित
जोडप्यांना समर्पित
संत कबीरांना एकाने सुखी संसाराचे रहस्य विचारले.
 
कबीरांनी भरदिवसा बायकोला कंदिल मागितला. तिने तो विना तक्रार आणून दिला. थोड्या वेळाने तिने दोघांना दूध आणून दिले. कबिरांनी ते प्यायल्या नंतर म्हणाले. वा..गोड आहे दूध. त्या मनुष्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला कबीरजी तुम्ही भर दिवसा कंदिल मागितला. आणि आत्ता तर दुधात मिठ टाकले असतानाही दूध गोड आहे म्हणता हे कस काय आहे. त्यावर कबीर म्हणाले हेच सुखी संसाराचे रहस्य आहे. मी दिवसा कंदिल मागितला तरीही तिने त्यात दोष न पाहता आणून दिला. नंतर तिच्या कडून चुकून दुधात साखरे ऐवजी मिठ पडले तरी मी तिच्यात दोष न पाहता गोड म्हणालो. याचा अर्थ असा की मी तिला समजून घेतले व तिने मला समजून घेतले. हेच सुखी संसाराचे रहस्य आहे. 
 
ज्याचे बायकोशी नीट
त्याचे घरी सोन्याची वीट