बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

कोलंबी कटलेट

साहित्य: 1 वाटी कोलंबी, 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, 1 चमचा धणेपूड, तिखट, मीठ, हळद, तेल.
 
कव्हरसाठी: अर्धा किलो बटाटे, तिखट, मीठ, मिरपूड
 
कृती: कोलंबी स्वच्छ धुऊन बारीक चिरा आणि हळद व मीठ लावा. थोड्या तेलावर कांदा परतून त्यात धणेपूड टाकून परता. त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून परता मग कोलंबी घाला. त्यावर झाकण ठेवून कोलंबी शिजू द्या. कोलंबी शिजल्यावर पाणी आटवून घ्या. आता त्यात तिखट, मीठ, ओले खोबरे घाला. मिश्रण कोरडे झाल्यावर त्यात कोथिंबीर घाला व थंड होऊ द्या. कव्हरसाठी उकळलेले बटाटे मॅश करा. त्यात थोडे तिखट, मीठ, मिरपूड व 1 चमचा कॉर्नफ्लोअर घाला. आता त्याचे गोळे करून त्यात सारण भरून कटलेट तयार करा. रव्यात घोळून तव्यावर तेलाने शॅलो फ्राय करून घ्या.