testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मटर खिमा

वेबदुनिया|
साहित्य : 250 : ग्रॅम मटाराचे दाणे, 1/2 किलो खिमा, 3 कांदे बारीक चिरलेले, 10-12 लसणाच्या पाकळ्या 1/2 चमचा आलाची पेस्ट, 3 मोठे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे धन्याची पूड, 1/2 वाटी तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.
कृती :

सर्वप्रथम टोमॅटो उकळून त्याचे सालं काढून बारीक बारीक चिरावे. खिमा स्वच्छ धुऊन चाळणीत ठेवून त्याचे पाणी काढून घ्यावे. कांदे किसून घ्यावे. कुकरामध्ये तेल घालून त्यात किसलेला कांदा चांगला परतून घ्यावा, व नंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड, व खिमा घालून या मिश्रणाला लाल रंगावर परतून घ्यावे. नंतर त्यात मटाराचे दाणे, थोडे टोमॅटो, मीठ व 3 वाट्या पाणी घालून 3 मिनिट शिजवावे. कुकर थंड झाल्यावर त्यावर कोथिंबीर घालवी व सर्व्ह करावा.


यावर अधिक वाचा :