गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

सातारी झटपट मटण

साहित्य : एक किलो मटण, चार कांदे, सुकं खोबरं २०० ग्रॅम, आलं, लसूण, गरम मसाला, हळद, मीठ, कढीपत्ता, घाटी मसाला (मसाल्याच्या दुकानात मिळतो)

कृती : मटणाला हळद-मीठ लावून मसाला होईपर्यंत बाजूला ठेवून देणे.

मसाल्यासाठी कृती: कढईत खोबरं तांबूस भाजून ठेवा. दोन कांदे कापून भाजून घेणे. गार करून त्यात सात-आठ लसणाच्या पाकळ्या, आलं, हळद, मीठ घालून बारीक पेस्ट करणे.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा घाला व तांबूस होईपर्यंत परतून घ्या. त्यात दीड चमचा घाटी मसाला घालून परतून घ्या. नंतर त्यात कढीपत्ता, चवीनुसार गरम मसाला व मसाला पेस्ट घालून परत परतून घ्या. आता त्यात हळद-मीठ लावून ठेवलेले मटण घाला व मटण आणि मसाला एकजीव होईपर्यंत परतावा (दोन मिनिटे) व पाणी घालून चार शिटय़ा काढा.