शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

अंडा पराठा

साहित्य : २ वाट्या कणीक, मीठ, ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा, 
 
आतील सारण: ३-४ अंडी, १ कांदा, ४-५ हिरव्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा गरम मसाला, मीठ.
 
कृती : अंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे. अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे. कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात. एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी. कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.