शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

एग राइस

PR
साहित्य : दीड कप तांदुळ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 लहान चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 मोठे टोमॅटो ‍बारीक चिरलेले, 4 अंडी उकळून काप केलेले, 1 मोठा चमचा पोदीनेची पेस्ट, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 लहान चमचा गरम मसाला, थोड्यासा दुधात 5-6 केशर काड्या भिजलेल्या, थोडंसं भिजलेली कणीक भांड्याच्या झाकणाला सील करण्यासाठी, चवीनुसार मीठ व 2 मोठे चमचे तेल.

कृती : तांदुळाला एक शिजवून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात कांदा-लसूणपेस्ट घालून परतावे. त्यात मीठ, गरम मसाला, तिखट आणि हळद टाकावे. टोमॅटो घालून झाकण ठेवून शिजू द्यावे. 5 मिनिटाने त्यात पोदीन्याची पेस्ट घालावी. तयार ‍भात आणि मसाला मिक्स करून एका भांड्यात घालावे त्यावर अंड्याच्या स्लाइस घालून चारी बाजूने दुधाचा शिपका द्यावा. भांडे झाकून त्याच्या चारीबाजूला कणकेची तयार पेस्टने सील करून 15 मिनिट शिजवावे. सर्व्ह करताना कांदे, टोमॅटो व रायत्या सोबत द्यावे.