गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

खिमा टिक्की

WD
साहित्य : खिमा- २०० ग्रॅम, कांदा (बारीक चिरून) १ चमचा, आलं-लसूण पेस्ट- १ चमचा, लाल तिखट- १ चमचा, गरम मसाला- १ चमचा, मीठ- चवीप्रमाणे, लिंबू रस- १ चमचा, बटाटे (उकडलेले)- ४, कॉर्न फ्लॉवर- ३ चमचे, तेल- तळण्यासाठी.

कृती : प्रथम उकडलेले बटाटे किसून त्यामध्ये मीठ, लाल तिखट व कॉर्न-फ्लॉवर घालून मळून घेणे. थोडे मीठ घालून खिमा शिजवून घ्यावा. त्यानंतर कढईत तेल गरम करून कांदा परतून घेणे. कांदा लालसर झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी. नंतर खिमा घालावा. लाल तिखट, गरम मसाला व कोथिंबीर घालून कोरडे होईपर्यंत परतवावे. कोरडा झाल्यावर खिमा गार होऊ द्यावा. त्यानंतर बटाटय़ाच्या लगद्याची छोटी वाटी तयार करून त्यामध्ये खिमा भरावा. घट्ट दाबून त्याला गोल व चपटय़ा अशा टिक्कीचा आकार द्यावा. फ्राइंग पॅनमध्ये मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत श्ॉलो फ्राय करावे. पुदिना, चटणी व ब्रेड बरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करावे.