मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चायनिज पुलाव

साहित्य-  500 ग्रॅम बासमती तांदूळाचा भात, 125 ग्रॅम पत्ताकोबी, कांद्याची पात, 2 गाजर, 1/2 वाटी हिरवे मटार उकळलेले, 10-15 मशरूमचे टुकडे, 1/2 पाकीट सिजनिंग, 2 मोठे चमचे सोया साँस, अजीनोमोटो, 2 मोठे चमचे रेड चीली साँस, 250 ग्रॅम मटनाचे तुकडे, तळण्यासाठी तेल, 2 सिमला मिरच्या. 

कृती- एका कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात सर्व भाज्या चिरून टाका व उकळलेले मटर टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यात मटनाचे तुकडे, सोया साँस, चिली साँस, स‍िजनिंग, मशरूमचे तुकडे, चवीनुसार अजिनोमोटो टाकून मिक्स करा. नंतर त्यात तयार भात घालून मिक्स करा. गरम गरम पुलाव टोमॅटो किंवा चिली साँस टाकून सर्व्ह करा.