गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

टोमॅटो मटण

साहित्य : 500 ग्रॅम मटण, 250 ग्रॅम टोमॅटो, 2 मोठे चमचे मैदा, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा काळेमिरे पूड, 1 छोटा चमचा मीठ, 2 मोठे चमचे तूप किंवा तेल, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 चमचा तुळशीच्या पानांची पूड, कोथिंबीर.

कृती : मटणाचे दीड इंच लांबीचे तुकडे करावे. टोमॅटोचे चार काप कापावे. कांद्यांना बारीक चिरून घ्यावे. प्रेशर कुकरामध्ये मटण, 1/2 लहान चमचा मीठ, 1/4 चमचा काळे मिरे पूड व 1 कप पाणी घालून 5 मिनिट शिजवावे. थंड झाल्यावर मटण बाहेर काढून, पाणी वेगळे ठेवावे.

मैद्यात उरलेले मीठ, काळे मिरे व धने पूड टाकावी. पॅनमध्ये एक चमचा तूप घालावे. मटणाचे तुकडे मैद्यात रोल करून तळून घ्यावे. सर्व तुकडे बेकिंग ट्रेमध्ये सेट करण्यास ठेवावे.

उरलेल्या तुपात कांदा घालून परतून घ्यावा व त्यात मैदा टाकावा. 2-3 मिनिटानंतर त्यात टोमॅटो, स्टॉक, कोथिंबीर आणि साखर घालून एक उकळी आणावी. ह्या मिश्रणात मटण घालून वरून तुळशीची पूड घालून सर्व्ह करावे.