शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

फिश क्रॉकेटस

साहित्: 1 कप पाणी, 6 लहान बटाटे, 675 ग्रॅम रावस माशाच्या तुकड्या, 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा चमचा वर्सेस्टरशायर सॉस, 1 मोठा पार्सली चिरलेली, 1 छोटा चमचा मीठ, चिमूटभर मिरे पूड, 1 लहान चमचा मैदा, 1 अंडे घुसळलेले, 1/2 कप ब्रेड चुरा, 2 कप तेल, टोमॅटो कॅचप.

कृती : कुकरमध्ये पाणी घाला. बटाटे घाला. मासा एका वेगळ्या भांड्यात ठेवा. कुकर बंद करून 5 मिनिटे शिजवा. नंतर कुकर उघडा. मासा आणि बटाटे काढा. माशाचे काटे आणि खवले काढा. बटाटे सोलून काट्याने त्यांचा लुसलुशीत लगदा करा. मासा बटाटे, कांदा, वर्सेस्टरशायर सॉस, पार्सली, मीठ आणि मिरे एकत्र करून चांगले मिसळा. मिश्रणाचे 12 भाग करा. पाटावर मैदा पसरा. पाटावर 5 सें. मी. लांबीचे लांबट कबाब तयार करा. प्रत्येक कबाब अंड्यात आणि ब्रेडच्या चुऱ्यात बुडवा. तेल गरम कबाबाला बदामी होईपर्यंत तळा. टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम वाढा.