शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

बटाटे-अंड्याची रस्सेदार भाजी

साहित्य- 3 उकडलेली अंडी, 2 उकडलेले बटाटे, 4 लवंगा, 8-10 काळे मिरे, थोडे आले, 7 पाकळ्या लसूण, 3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पूड, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, 2 कप पानी, 3 चमचे तेल.

कृती- अंड्याचे दोन भाग करा. बटाट्याचे छोटे काप करा. आले-लसूण, हिरवी मिरची, लवंग, काळे म‍िरे बारीक करून घ्या. कढईत तेल गरम करून 3 काळे मिरे टाका. नंतर कोथिंबीर टाकून शिजवून घ्या. बारीक केलेला मसाला टाका. तेल सुटेपर्यंत भाजा. धने पावडर, गरम मसाला, मीठ, हळद टाकून दोन मिनीटे परता.

आता पानी टाकून उकळी आणा व अंडी टाका. दोन मिनिटांनी गँसवरून उतरवून घ्या. गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करा.