शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फोटोदुनिया
Written By वेबदुनिया|

फाळणीचे शिल्‍पकार....?

PIB
हिंदुस्‍तानच्‍या फाळणीस जबाबदार कोण? या प्रश्‍नाबाबत देशभरातील बुध्‍दीवाद्यांमध्‍ये निश्चितपणे दुमत असू शकेल. भाजपातून निलंबित करण्‍यात आलेले वरिष्‍ठ नेते जसवंत सिंग यांनी आपल्‍या पुस्‍तकातून या अनेक वर्षांपासून शांत झालेल्‍या निखा-यावरील राख पुन्‍हा उडविली असली तरीही फाळणीचे दोन प्रमुख सुत्रधार म.गांधी आणि मोहम्मद अली जिन्‍ना यांच्‍यात घनिष्‍ठ मैत्री होती हे देखिल नाकारून चालणार नाही. भारतीय स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या काळातील या दोन दिग्गज नेत्यांमध्‍ये फाळणीच्‍या मुद्यावरून मतभेद होते. म.गांधीजींनी फाळणी टाळण्‍याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्‍यांनी 1944 मध्‍ये मुंबईत जिन्‍नांसोबत दीर्घकाळ चर्चाही केली मात्र तोडगा निघु शकला नाही. आणि अखेर हिंदुस्‍तानचे पाकिस्‍तान आणि भारत असे दोन तुकडे झाले.