गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

अंधार्‍या रात्री

- दादाससहेब तांदळे

ND
अंधार्‍या रात्री,
डोळेही सरावतात,
अंधाराला !
आणि अंधारात होणार्‍या
माणसातल्या पशुंच्या
किळसवाण्या खेळाला !
आणि ही,
किळसवाणी कृत्ये,
पहावी लागतात
डोळे असून
अंधळ्या सारखं !
अंगातली रग,
हातातलं बळ,
घेतलंय त्यानी
पिळून पिळून
म्हणून डोळे फोडून
हातही तोडून
पडावं वाटतं
लोळा गोळा होवून
असलं हे आळणी
जीणं जगण्यापेक्षा !