बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाक

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नह

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयातंला हार, म्हनू नको रे लोढन

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एकतोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गो

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेव

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिकने सागर गोट

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दु:खाले होकार...