आजचा दिवस
- सौं.स्वाती दांडेकर
आजचा दिवस ताजा असतो, विचार करायला मोकळा असतो उद्या तो शिळा होणार, भूतकाळात जमा होणारहातातल्या वाळू गत निसटुन जाणारकालचा दिवस उद्या इतिहास होणार ..१..आजचा दिवस वर्तमान आहेईच्छा, अपेक्षा, पूर्तिचा संसार आहेभविष्याचा आधार आहेआशेची किरण अन उमेदिची सकाळ आहेविश्वासाचा भक्कम पाया अनसायंकाळची निवांत सांजवात आहेआजचा दिवस फक्त माझा आहे ..२.. आजचा दिवस देवान दिलेल नव जीवन आहेजीवनाच कोर पान पुन्हा माझ्या समोर आहेकतृत्वाच्या लेखणीन मनाजोग भरायच आहेआजचा दिवस फक्त माझा आहे ..३..माझा दिवस मला घडवायचा आहेकतृत्वाच्या कसोटीवर पारखायचा आहेविश्वासाच्या बळावर उजळावयाच आहेआशेच्या पंखांनी फुलवायच आहेदुसर्याचा मार्ग प्रशस्त करायचा आहेवाटेवरचा दगड नाही निवा.याच वृक्ष बनायच आहेमाझा आजचा दिवस मला जगायचा आहेआठवणींच्या बागेत फुलवायचा आहेमाझा आजचा दिवसमला जगायचा आहे.