शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By डॉ. उषा गडकरी|

एकच

ND
तनात-मनात एकच धून
श्वासात-जीवात एकच खूण
अंगणात-परसात एकच ताल
दारात-घरात एकच खेळ

जनात-वनात एकच लय
मनी-मानसी एकच सय
जीवन-मरणात एकच आस
तुझ्या-माझ्यात एकच श्वास !