शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

मराठी कविता : स्त्री

- सौं. स्वाती दांडेकर

आयुष्याच्या घरटया मघुनी
जीवनाचे सूर साधते
जगते, जगवीते
WD
प्रेमाचे धागे जुळवीते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ...१.

सप्तपदीची सात पाऊले
सात वचने विश्वासाची
अंगारून येते मम गृहा
माप ओलांडुनी तुक्षे माझ्यात
सामावुन घेते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ....२.

अर्धागिनी, गृहस्वामीनी
कूलवधु,भावी माता
प्रेमाची परिभाषा, विश्वासाची आशा
हृदयाचे धागे जुळवुनी
बीज उदरी जोपासते
कूलदीपक जीवन आशा तेववीते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .....३.

आयुष्याच्या घरटया मघुनी
प्रेमाचे सूर साधूनी
मायेची ऊब देऊनी
नव-जीवन, नव आशा
जीवनाची अभिलाषा
वीर शिवाजी, लक्ष्मीबाई
भावी पिढीचे मानकरी
निराकाराला आकार देते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ......४.

अबोंल भाषा जीवनाची
मूक भाषा स्वप्नांची
हळवी पालवी भावनांची
तृप्तता पाणावल्या नेत्रांची
अस्मिता राखते जीवनाची
जीवनाचे सूर साधते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ......५.