शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

विस्फोट

शशीन् वरधावे

वेदना आता वर्तमानाची काळजाला हेलावून गेली
यादवी दृष्ट तांडवाची आता भोगण्या सत्यांत आली ।। धृ।।

भंगल्या विश्वात अमुच्या सांडलेले हे श्वास राहिले
पसरलेल्या ताटात आता पुन्हा भुकेले घास राहिले
निष्पाप जनतेच्या जीवांची क्षणांत एका राख झाली
यादवी दृष्ट तांडवाची अता भोगण्या सत्यांत आली ।।1।।

कलीयुगाचे दाहक निखारे राखेतच विझले, मिटले
क्रूर धर्मांधांस पुसा त्यांनी किती निष्पाप जीव घेतले
सामान्य जिवनांची आस जळताना आम्ही पाहीली
यादवी दृष्ट तांडवाची आता भोगण्या सत्यांत आली ।।2।।

बेशरम शासनाची कोणी अन् कशी शाश्वती द्यावी
पुन्हा पुन्हा ह्या भूमीवरी स्फोटांची मालिका घडावी
अराजकतेच्या ज्वलंत रुपाची आम्हा प्रचिती आली
यादवी दृष्ट तांडवाची अता भोगण्या सत्यांत आली ।।3।।