गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

शब्द

शशीन् वरधावे

ND
शब्द ज्यांचे सारे ऐकतात
तेच खरे कवी असतात
शब्द ज्यांच्या अधीन असतात
तेच खरे कर्ते असतात

शब्द जेव्हा एकत्र येतात
तेव्हा ते काव्यात उतरतात
शब्द जेव्हा सांघले जातात
तेव्हा ते कविता बनतात

खरे कवी शब्द गुंफतात
बाकी सर्व शब्द जोडतात
शब्द जुळून शब्द गुंफून
सच्चे कर्ते काव्य करतात

शब्दांची जेव्हा रचना बनते
तेव्हा शब्द शब्द नसतात
शब्दांतून सकारलेल्या
शब्दांची ते प्रतिमा असतात

शब्दांना जेव्हा लय येते
तेव्हा शब्द सूर संघतात
सुरांना जेव्हा ताल मिळतो
तेव्हा शब्द तालबद्ध होतात

अशा शब्दांची एक कविता
शब्दांचीच शब्द करतात
शब्दांनीच मग माला बनते
त्याला सर्व गाणे म्हणतात.