गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

शब्द

- स्वाती दांडेकर

भावनांच्या अभिव्यक्तिचे माध्यम
असे शब्द चयन
अनमोल मनीच्या भावना
व्यक्त होतात शब्दातुन
कधी सौम्य, कधी कठिण
तर कधी असतात कटु हे

प्रेमाच्या आंतरिक क्षणी
दोन जीवांची भाषा
करून कर्ण मधुर
व्यक्त करतात हे

करी घायाळ हे आपुल्या
तिक्ष्ण बाणांनी
घालतील मायेची पाखर
आपुल्या मृदु वचनांनी
ही शब्द माया असे
वरदान देवाचे
जयास लाभे तो सुखावे
न लाभता वरदान हे
त्याचे दु:ख तोच जाणे

शब्द-शब्दाने जुळती जीवन धागे
कटु वचनांनी पडती गाठी
सोडवणुक करता ह्यांची
तुटते तार जीवनाची

शब्द रूपी अनमोल मोती
सापडतात जीवन सागरी
वेचुन त्यांना घडवावी
माळ ही जीवनाची