शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

समजुत

सौ. स्वाती दांडेकर

ND
परतव नेत्रां मधले पाणी
कटाक्षाने कठोरपणे
कमजोर करतील तुला हे
तुझे मन व्याकुल करतील हे
घायाळ मन बरसेल पुन्हा
नेत्रां मधल्या अश्रुंनी
म्हणुनच परतव नेत्रां मधले पाणी ।।1।।

तळमळ तुझ्या हृदयाची
न कोणाला कळली आजवरी
उमडतील अस्वस्थ भावना पुन्हा
नेत्रां मधल्या अश्रुंनी
म्हणुनच परतव नेत्रां मधले पाणी ।।2।।

हिरवणीचा रस्ता सोडुन
कठीण मार्ग आक्रमिला आपल्या साठी
जीवन ज्योत तेवली दुसर्‍याची
रूतलेले काटे बोचतील पुन्हा
नेत्रां मधल्या अश्रुंनी
म्हणुनच परतव नेत्रां मधले पाणी ।।3।।

पग-पग करूनी संपत चालली
आता यात्रा ही जीवनाची
कडु-गोड आठवणीची झाली मनात दाटी
एक एक करूनी वाहतात अश्रुंच्या रूपानी
अश्रुंनी दिसते विश्व अंधुक से
पुसीन नेत्रांतले अश्रु
आणुन स्मित हास्य वदनी ।।4।।