testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आपले जीवन आपण घडवायचे असते

सौ. स्वाती दांडेकर

marathi kavita
वेबदुनिया|
WD
आपले जीवन आपण घडवायचे असते
दुसर्‍याला कर्णधार करायचे नसते
आपले जीवन आपण घडवायचे असते

आईचे बोट धरून दिशा ठरवायची असते
पुढची पायवाट आपण आपली चालायची असते
दर्‍या खोर्‍यातून समतल जमीन हुडकायची असते
आपले जीवन आपण घडवायचे असते

वडिलांच्या डोळ्यांनी स्वप्न ठरवायचे असते
स्वप्नपूर्तिसाठी मग आपण झटायचे असतेहोणर्‍या कष्टाना नजरेआड करायचे असते
आपले जीवन आपण घडवायचे असते

पैशासाठी पदर पसरायचा नसतो
लाचारी स्विकारून जगायचे नसते
संकटाना सामोरी जाउन कष्टानी मात करायची असते
आपले जीवन आपण घडवायचे असते

रडत बसुन दिवस घालवायचा नसतोभविष्याचा विचार करून
आत्मविश्वास बाळगायचा असतो
कर्मविरांचा इतिहान घडवायचा असतो
आपले जीवन आपण घडवायचे असते

उद्याच्या आनंदासाठी आज द्यावा लागतो
अनुभवातुन शहाणपण शिकायचे असते
आपले जीवन आपण घडवायचे असते.


यावर अधिक वाचा :

कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती

national news
कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना ...

लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम वेळ आणि थांबे कळणार

national news
सर्वांची लाडकी आणि सार्वजनिक वाहन व्यवस्था असल्लेली जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी ...

न्यायदेवतेमुळे लोकशाही वाचली - शिवसेना

national news
शिवसेना मुखपत्र सामना मधून भाजपावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटक येथे झालेली निवडणूक ...

द बर्निंग ट्रेन : आंध्रप्रदेश एक्सप्रेसच्या 4 डब्यांना आग

national news
आंध्रप्रदेश एपी एसी एक्सप्रेसच्या डब्यात अचानक सोमवारी दुपारी किमान 12 वाजता आग लागली. ...

राजीव गांधी आणि मृत्यू

national news
21 मे 1991. राजीव गांधी स्वतः विमान चालवित विशाखापट्टणम्वरून चेन्नईला पोहोचले. आजचा आपला ...