शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

भाग्य रेखा

- स्वाती दांडेकर

WD

ही भाग्य रेखा हातावरची

सांगते भूत भविष्याची स्थिती

असता दाट भाग्य रेखा

म्हणतात सुखी राहील जगी

जर दिसता बारीक ही

काय माहीत कशी राहील ही

भूत-भविष्य, वर्तमान यांचे

निराकरण ह्या रेखांन वरती

हीच सर्वमान्य जगी

मानते भाग्यरेखा

सर्वस्व असते जगी

पण कर्मरेखा ही असे मोठी

हात बळकट असता कर्माचा

बदलतो तोही भाग्य रेखा

सत्कर्माने जीवन बदले

भाग्य ही त्या समोर हार माने

कर्माचे धन हे मोठे

स्वाभीमानाचे जीवन देते

भाग्याने सर्व मिळता जगी

त्याची ना कधी किमत कळते

नेपोलियनच्या हातात नव्हती भाग्य रेखा

त्याच्या भाग्याचा तोच विधाता

कर्म महान असे जगी

लोकमान्य ही सांगुन गेले भूवरी

कर्मानी जीवन घडवावे

भाग्याची साथ घ्यावी

वारा वाहेल तशी वाढवावी जीवन होडी

सत्कर्माची ना साथ सोडावी

भाग्यवरती ना जीवन चालवी

हीच आहे रित जगाची

सांगुन गेले सत्पुरुष महाज्ञानी