testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी कविता : मॉडर्न बायको

wife
WD

आया, बाया, सासवांनो,

सांगू नका नाव घ्यायला

मी मॉर्डन बायको त्यांची

उखाणा नाही येत मला

कुंकवापेक्षा सोपी टिकली

साडी नको जिन्स-कुर्ती चांगली

उगा उडवू नका तुम्ही मला

मी शॉपिंगला चालली

मी नाही लाजरी बुजरी

मी स्मार्ट सुनबाई सासरी

मी भीत नाही कोणाला घरी

'सुपर वुमन'मी आजची नारी

स्वयंपाकाचा मला कंटाळा भारी

बोअर वाटते भाजीपोळी

पिझ्झा, बर्गरची लज्जत न्यारी

हॉटेलची हौस करतात हेच पुरी

म्युझिक, डान्स, मौज, मस्ती

टिव्ही, सिनेमाशी पक्की दोस्ती

मोबाईल माझा सखासोबती

नका करू नाव घेण्याची सक्ती

पार्लरची मी करते वारी

फॅशनची मला आवड भारी

या नखर्‍यावर खुश त्यांची स्वारी

मग का उगा नाव घेण्याची बेजारी?

समसमान आम्ही दोघेजण

ते राजा अन् मी राणी

मीही खूप पैसा कमावते

कशाला गाऊ त्यांच्या नावाची गाणी?


वेबदुनिया|

डॉ. मीनल सोसे


यावर अधिक वाचा :

मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळला, ३०जखमी

national news
पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळून ...

आता चित्रपटातच्या सब टायटल्ससाठीही सेन्सॉरशिप

national news
यापुढे चित्रपटातील संवादांसाठी वापरल्या जाणाऱ्या सब टायटल्ससाठीही आता सेन्सॉरशिप घ्यावी ...

रसगुल्ल्यावरून लग्नात राडा

national news
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मणिराम आखाड्याजवळ वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी ...

तिरुपती मंदिर सहा दिवसासाठी बंद

national news
तिरुमाला येथील भगवान वेंकटेश्वराचे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर सहा दिवस बंद ठेवण्यात ...

झारखंड: एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

national news
बुराडी कांडनंतर झारखंडमधील हजारीबागमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांनी आत्महत्या केल्याची ...