अंधार्या रात्री
- दादाससहेब तांदळे
अंधार्या रात्री, डोळेही सरावतात,अंधाराला !आणि अंधारात होणार्यामाणसातल्या पशुंच्याकिळसवाण्या खेळाला !आणि ही,किळसवाणी कृत्ये, पहावी लागतातडोळे असूनअंधळ्या सारखं !अंगातली रग, हातातलं बळ,घेतलंय त्यानी पिळून पिळूनम्हणून डोळे फोडून हातही तोडून पडावं वाटतं लोळा गोळा होवून असलं हे आळणीजीणं जगण्यापेक्षा !