शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

आजचा दिवस

- सौं.स्वाती दांडेकर

WD
आजचा दिवस ताजा असतो,
विचार करायला मोकळा असतो

उद्या तो शिळा होणार, भूतकाळात जमा होणार
हातातल्या वाळू गत निसटुन जाणार
कालचा दिवस उद्या इतिहास होणार ..१..

आजचा दिवस वर्तमान आहे
ईच्छा, अपेक्षा, पूर्तिचा संसार आहे
भविष्याचा आधार आहे
आशेची किरण अन उमेदिची सकाळ आहे
विश्वासाचा भक्कम पाया अन
सायंकाळची निवांत सांजवात आहे
आजचा दिवस फक्त माझा आहे ..२..

आजचा दिवस देवान दिलेल नव जीवन आहे
जीवनाच कोर पान पुन्हा माझ्या समोर आहे
कतृत्वाच्या लेखणीन मनाजोग भरायच आहे
आजचा दिवस फक्त माझा आहे ..३..

माझा दिवस मला घडवायचा आहे
कतृत्वाच्या कसोटीवर पारखायचा आहे
विश्वासाच्या बळावर उजळावयाच आहे
आशेच्या पंखांनी फुलवायच आहे
दुसर्‍याचा मार्ग प्रशस्त करायचा आहे
वाटेवरचा दगड नाही निवा.याच वृक्ष बनायच आहे
माझा आजचा दिवस मला जगायचा आहे
आठवणींच्या बागेत फुलवायचा आहे
माझा आजचा दिवस
मला जगायचा आहे.