शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

आधार

डॉ. सौ. उषा गडकरी

'कशी आहे?'
'बरी आहे.'

'काय करतेस?'
'रेटेत आहे.'

ND
'कोण सोबतीला?'
'माझी मीच.'

'हत् वेडे, इतका भरभक्कम आधार!
मग रेटते आहे काय म्हणतेस ?
सुसाट वेगाने पळते आहे म्हण.

असा आत्मनिर्भर, निरकुंश आधार
भल्या भल्यांना दुर्मिळ !
तुझी तूच होऊन राहा.

मुक्कामच येईल सामोरा तुला
दोन्ही भुजा उभारून
अभिवादन करेल तुला

मग तूच विचारशील मला
'काय? बरी आहेस ना? '