शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

आपले जीवन आपण घडवायचे असते

सौ. स्वाती दांडेकर

WD
आपले जीवन आपण घडवायचे असते
दुसर्‍याला कर्णधार करायचे नसते
आपले जीवन आपण घडवायचे असते

आईचे बोट धरून दिशा ठरवायची असते
पुढची पायवाट आपण आपली चालायची असते
दर्‍या खोर्‍यातून समतल जमीन हुडकायची असते
आपले जीवन आपण घडवायचे असते

वडिलांच्या डोळ्यांनी स्वप्न ठरवायचे असते
स्वप्नपूर्तिसाठी मग आपण झटायचे असते
होणर्‍या कष्टाना नजरेआड करायचे असते
आपले जीवन आपण घडवायचे असते

पैशासाठी पदर पसरायचा नसतो
लाचारी स्विकारून जगायचे नसते
संकटाना सामोरी जाउन कष्टानी मात करायची असते
आपले जीवन आपण घडवायचे असते

रडत बसुन दिवस घालवायचा नसतो
भविष्याचा विचार करून
आत्मविश्वास बाळगायचा असतो
कर्मविरांचा इतिहान घडवायचा असतो
आपले जीवन आपण घडवायचे असते

उद्याच्या आनंदासाठी आज द्यावा लागतो
अनुभवातुन शहाणपण शिकायचे असते
आपले जीवन आपण घडवायचे असते.