शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

भाव कणिका

- विजया भुसारी

ND
कधीच कुठे बोलले नाही,
कधीच कुठे सांगितले नाही,
शब्द माझे फितूर झाले,
काव्यामधुनी रहस्य उमले.

मनातल्या काजळरेखेला
सुवर्णाचे बोट लावलेस
साऱ्या सान्या जीवनाचेच
सोने झाले.

एकट्या एकाकी कबुतराची
व्यथा मला उमगली
पण दु:खानंच दु:खाची
समजून कशी घालावी?

मनाच्या ही अंतर्यनात
एक कळी
मिटली होती,
फुलायचेच
विसरली.

साभार - इंदुर लेखिका संघ, इंदुर.