शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

वणवा

- भावना दामले

ND
मनाचे जंगल तर खूप गहन असते
जितके आत डोकवा
तितकेच खोल असते.
वणवा फक्त रानावनातच नसतो
तो तर मनात पण असतो
धगधगत असतो.
इच्छेचा पालापाचोळा, आशाकाष्ठाची
आहुती घेऊन जळतच असतो,
तो कशाने विझेल हे माहीत नसते.
कोणती जलधारा त्याला शांत करेल
हे कळत नसते.
आणि जेव्हा कळते तेव्हा,
काळाने वणवा विझलेला असतो,
आपली स्मृती चिन्हे मागे ठेवून,
हेच तर जीवन असते.
जे आपल्याला कळत नाही आणि
ज्यावेळी कळते तेव्हा
त्याची गरज नसते.
वेळ तर निघून गेलेली असत
हातात काहीच नसते.....

साभार - इंदुर लेखिका संघ, इंदुर.