testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

vasant
Last Modified शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (14:46 IST)
मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखलेजाणरे
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक – राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे.

तर त्यांनी ‘नवभारत’ या मासिकाचे ते संपादकही होते. गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींमुळे त्यांनी लिखाण थांबवले होते.
वसंत पळशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला. संवादाला प्राधान्य देणारे पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री – पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अर्धांगवायूने ग्रासले होते. शनिवारी पहाटे नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.


यावर अधिक वाचा :